आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभरातील पावसाचा जोर ओसरला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - उत्तर आणि ईशान्य भारतात तसेच शेजारच्या गुजरातेत मान्सून जोरदारपणे सक्रिय झाला असून राज्यातील जोर ओसरला आहे. गेल्या चोवीस तासांत कोकण किनारपट्टी वगळता राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दोनच दिवसांपूर्वी अनेक ठिकाणी तब्बल दोनशे मिलिमीटर पाऊस कोसळलेल्या महाराष्ट्रात शनिवारी एकाही गावात शंभर मिलिमीटरसुद्धा पाऊस झाला नाही. सह्याद्री घाटमाथ्यावरच्या काही गावांमध्ये 80-90 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

येत्या चोवीस तासांत कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. कोकण-गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची चिन्हे आहेत. उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी तुरळक सरी बरसण्याचा अंदाज आहे, असे हवामानखात्याने सांगितले.

अशा हवामानस्थितीमुळे इशान्य भारतातील राज्यांमध्ये तसेच उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. उत्तर आणि ईशान्य भागातील मान्सूनचा जोर टिकून राहण्याची चिन्हे आहेत. दक्षिणेतील राज्यांमध्ये प्रामुख्याने कोरडे वातावरण आहे, असे सूत्रांनी सांगितले.

कोकणात सर्वत्र पावसाचा जोर कायम आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूरच्या सर्व तालुक्यात पाऊस झाला. मराठवाड्यात लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम पाऊस झाला. उर्वरित मराठवाडा कोरडा होता. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही ढगाळ वातावरण असले तरी पाऊस नव्हता.

पावसाची आकडेवारी
अलीबाग 06
मुंबई 02
रत्नागिरी 13
महाबळेश्वर 38
नाशिक 02
इगतपुरी 43
त्र्यंबकेश्वर 15
चाळीसगाव 02
जामनेर 1.4
पाचोरा 3.1
हिंगोली 10.3
पूर्णा 03
नांदेड 04
लातूर 3.6
उस्मानाबाद 2.4
अकोला 02