आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी; मराठवाड्यात काही ठिकाणी गडगडाटासह हलका पाऊस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गारज : वैजापूर तालुक्यातील गारज व परिसरात रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास मेघ गर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. जवळपास अर्धा तास जोरदार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे नुकसान झाले आहे . छाया : दादासाहेब तुपे - Divya Marathi
गारज : वैजापूर तालुक्यातील गारज व परिसरात रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास मेघ गर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. जवळपास अर्धा तास जोरदार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे नुकसान झाले आहे . छाया : दादासाहेब तुपे
पुणे- राज्यात रविवारी अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. विदर्भात अमरावती जिल्ह्यात, तर मराठवाड्यात आैरंगाबाद शहर व जिल्ह्यात काही ठिकाणी दुपारी गडगडाटासह हलका पाऊस पडला. 

नगर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात रविवारी अवकाळी पाऊस झाला. राहुरी, श्रीगोंदे तालुक्यांसह अन्य भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. या अवकाळी पावसाचा कांदा, द्राक्षे, आंबा या पिकांना मात्र फटका बसला. वादळामुळे महावितरणने वीज पुरवठा खंडित केला होता. 

विदर्भात दुपारी चारच्या सुमारास अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे, तिवसा तालुक्यात वादळी वाऱ्याला सुरूवात होऊन सुमारे पाच ते दहा मिनिटे पावसाच्या सरी पडल्या. वादळी वाऱ्यामुळे या तालुक्यातील वीजप्रवाह खंडित झाला होता. मराठवाड्यात वैजापूर तालुक्यात हलका पाऊस झाला, तर औरंगाबाद शहर, परिसरात हलक्या सरी पडल्या. 

दोन दिवस पाऊस
मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात सोमवार-मंगळवार असे दोन दिवस तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
बातम्या आणखी आहेत...