आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात आज, उद्या पावसाचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मराठवाड्यात बुधवार व गुरुवारी मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी संभवते. मराठवाडा- विदर्भ व मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी तसेच कोकण व गोव्यात मुसळधार पाऊस होईल, असे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.

बुधवार व गुरुवारीही मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी, मराठवाडा विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. शुक्रवार आणि शनिवारीही मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...