आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात जाेरदार पावसाची शक्यता, मान्सूनने व्यापला 90 टक्के महाराष्ट्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसाचे ढगं गोळा झाल्याने मुंबईचे आकाश पहाटे असे दिसत होते. - Divya Marathi
पावसाचे ढगं गोळा झाल्याने मुंबईचे आकाश पहाटे असे दिसत होते.
पुणे - बहुप्रतीक्षित नैऋत्य मोसमी पावसाने विदर्भातून राज्यात प्रवेश केल्यानंतर अवघ्या ४८ तासांत राज्याचा सुमारे ९० टक्के भाग व्यापला आहे. राज्यात कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा अशा बहुतांश भागात पाऊस सुरू झाल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पावसाचे प्रमाण सर्वत्र समान नसले तरी कुठे हलक्या, कुठे मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. ४८ तासांत उत्तर अरबी समुद्र, उर्वरित महाराष्ट्र, मध्य प्रदेश, यूपीच्या पूर्व भागात मान्सून दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे.

मराठवाडा, विदर्भ चिंब
राज्यात २४ तासांत मराठवाडा, विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र व कोकणातही पाऊस सुरू आहे. २१ ते २३ जून दरम्यान मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. औरंगाबादेत मंगळवारी काही ठिकाणी पाऊस झाला.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा,
फोटोंमध्ये बघा मुंबई-पुण्याचा पाऊस....
बळीराजा झाला पेरता, जलयुक्त शिवारात पाणी साठले....
मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवर असा दिसत होता पाऊस.
अमृता राव या अभिनेत्रीने शेअर केलेला पावसाचा फोटो....
आज सकाळी पाऊस थांबला. पण लोकल सेवा कोलमडली. डोंबिवली स्टेशन सकाळी 8 ची वेळ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...