आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर;जोरदार पावसाने दिली वर्दी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांची (मान्सून) ‘दक्षिण दिग्विजय’ मोहीम सोमवारीही प्रगतिपथावर राहिली. मध्य कर्नाटक, आंध्रचा दक्षिण भाग आणि तामिळनाडूचे आकाश मान्सूनने व्यापले. कारवार, अनंतपूर, चेन्नईपर्यंत पोहोचलेला मान्सून काही तासांत गोवा व राज्यातील तळकोकणात दाखल होऊ शकतो. दरम्यान, दोन दिवसांत राज्यात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली असून, येत्या 24 तासांत उत्तर महाराष्ट्र वगळता राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे.
मान्सून शनिवारी केरळ किनारपट्टीवर दाखल झाला. येत्या 48 तासांत गोवा, मध्य अरबी समुद्र, सिंधुदुर्ग, कोल्हापूर तसेच कर्नाटक-आंध्रचा अंतर्गत भाग अणि बंगालच्या उपसागरात पोहोचेल, असे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले. राज्याच्या अनेक भागात पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तापमानातही लक्षणीय घट झाली आहे. विदर्भ वगळता राज्यात पारा 40 सेल्सियस अंशाच्या आत आला आहे. अरबी समुद्रात बाष्पयुक्त ढग दाखल होत आहेत.
> मराठवाड्यात विजांचे तीन बळी; अंबाजोगाईत दोन, नांदेडात एका महिलेचा मृत्यू