आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये मुसळधार : बारामतीत अवघ्या तासाभरात 135 मिलीमीटर पावसाची नोंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो. - Divya Marathi
सांकेतिक फोटो.
औरंगाबाद/पुणे-  राज्यात ठिकठिकाणी आज पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद, पिंपरी-चिंचवड, सातारा या शहरांना मुसळधार पावसाने झोडपले आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास औरंगाबाद शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. बारामतीत अवघ्या तासाभरात 135 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
 
बारामती शहरातील रस्त्यांना या पावसाने नद्यांचे स्वरुप आले. आमराई, खंडोबानगर परिसरातील अनेक घरात पावसाचे पाणी शिरले तर काही ठिकाणी बेसमेंटमधील गाळ्यातही या पावसाचे पाणी घुसले.
 
वाहनांनाही फटका
रस्त्यावर अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचून राहिल्याने दुचाकी व चारचाकी गाड्यांत हे पाणी शिरल्याने त्याही रस्त्यातच बंद पडल्या. 
बातम्या आणखी आहेत...