आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकणात पाऊस धो धो बरसला; कल्याणमध्ये रेकॉर्डब्रेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राज्यात आल्यापासून सहा दिवसांतच नैऋत्य मोसमी वा-यांनी (मान्सून) महाराष्‍ट्र व्यापला आहे. मध्य महाराष्‍ट्र आणि विदर्भाचा उर्वरित भाग व्यापत मान्सूनने सोमवारी मध्य प्रदेश आणि झारखंडमध्ये प्रवेश केला. कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावली. कल्याण तालुक्यात सोमवारी तब्बल 259 मिलिमीटर पाऊस कोसळला. गेल्या 24 तासांत राज्यात झालेला हा सर्वोच्च पाऊस ठरला.


कोकणात शब्दश: मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये वर्षभरात पडणारा पाऊस तीनच दिवसात कोकणातल्या अनेक गावांमध्ये झाला आहे. गेल्या तीन दिवसात ठाण्यात 334 (मिमी) पाऊस झाला. मुरुड येथे 387 मिमी पाऊस पडला. रत्नागिरीत तर कहरच केला आहे. दापोली तालुक्यात 528 मिमी पाऊस कोसळला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण, खेड, गुहागर, मंडणगड, रत्नागिरी, संगमेश्वर आणि लांजा या सर्व तालुक्यांमध्ये पावसाने तीनशे मिमीचा आकडा ओलांडला आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील स्थितीही वेगळी नाही. सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला, वैभववाडी या तालुक्यांमध्ये साडेतीनशे मिमीचा आकडा गाठला.


येत्या 24 तासांत मुसळधारचा अंदाज
येत्या 24 तासांत कोकण-गोव्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.


24 तासांतील पाऊस
कोकण : ठाणे- 219, भिवंडी- 210, रत्नागिरी- 129.7, खेड - 154.4, सावंतवाडी - 143, वेंगुर्ला - 137.
उत्तर महाराष्‍ट्र : सुरगणा - 21, दिंडोरी- 13, इगतपुरी - 63, त्र्यंबकेश्वर - 40, नाशिक - 9, पेठ - 33, धुळे - 24, शिरपूर - 98, अंमळनेर - 18.1, चोपडा - 13.
मराठवाडा : औरंगाबाद -10, पैठण - 10, जालना - 8.6, अंबड - 12, गेवराई - 6.3, अंबाजोगाई - 3.4, परळी - 5, गंगाखेड - 12.5.
पश्चिम महाराष्‍ट्र : पुणे - 2,
महाबळेश्वर - 141.