आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जून-जुलैमध्ये मराठवाडा, विदर्भात मान्सूनमध्ये खंड पडण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन लवकर होणार असून केरळमध्ये पोहोचल्यावर तो वेगाने पुढे झेपावेल. परिणामी महाराष्ट्रात २, ३ आणि ४ जूनदरम्यान दमदार पाऊस पडेल, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामानशास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी शनिवारी व्यक्त केला. यंदा राज्यात सरासरी १०२ टक्के पावसाची शक्यता आहे. नजीकच्या काळात मराठवाड्यातील औरंगाबाद आणि नांदेडचे हवामान अंदाज मॉडेल बनविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही डॉ. साबळे म्हणाले.

- वाऱ्याचा वेग कमी आढळल्याने मराठवाडा आणि विदर्भात जून आणि जुलै महिन्यात पावसाचे मोठे खंड पडण्याची शक्यता आहे.
- यंदा मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहणार नाही. त्यामुळे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातही चांगल्या पावसाची शक्यता आहे.
- राज्यात काही ठिकाणी कमी दिवसांत जास्त पाऊस, तर काही जागी पावसात खंड पडेल

या निकषांवर आधारित मॉडेल : कमाल तापमानाच्या नोंदी, सकाळ-दुपारची आर्द्रता, वाऱ्याचा वेग व प्रकाशाचा कालावधी या निकषांवर मान्सून अंदाजाचे मॉडेल आधारित आहे. त्यासाठी गेल्या ३० वर्षांतील डाटा वापरला जातो.

६५ मिमी पावसानंतरच पेरणी करावी
डॉ. साबळे म्हणाले, जूनमध्ये सुरुवातीस ६५ मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. चांगला पाऊस झाला तर जमिनीत ओल मुरेल व पुढे खंड पडला तरी पिके जगतील.
 
बातम्या आणखी आहेत...