आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा राज्यात पाऊस होणार बेताचाच, देशात १०२ % पाऊस : स्कायमेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - नैऋत्य मोसमी वाऱ्यांसोबत (मान्सून) येणारा पाऊस यंदा देशात वेळेवर दाखल होईल, परंतु महाराष्ट्रातले पाऊसमान बेताचेच असेल. हा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान अंदाज संस्थेने व्यक्त केला अाहे.

मान्सून मे महिन्याच्या २७ तारखेला केरळ किनारपट्टीवर दाखल होईल. यंदा देशपातळीवर सरासरीच्या १०२ टक्के पाऊस होईल, असा स्कायमेटचा अंदाज असून एकीकडे देशपातळीवर चांगल्या पावसाचा अंदाज असला तरी तेलंगण आणि नजीकचा मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा भाग येथे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असे संस्थेने नमूद केले आहे. येत्या जुलै महिन्यात हंगामातील सर्वाधिक पाऊस पडेल. ऑगस्टमध्ये सर्वात कमी पाऊस पडेल. उत्तर, मध्य आणि ईशान्य भारताच्या तुलनेत दक्षिण भारतातले पाऊसमान कमी असेल, अशीही निरीक्षणे ‘स्कायमेट’ने नाेंदवली अाहेत. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाचेही भाकीत वर्तवण्यात अाले आहे.

मेमध्येही बरसणार ‘स्कायमेट'च्या मते एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून चक्राकार वारे वाहू लागतील. याच्या प्रभावामुळे मेमध्ये पश्चिम किनारपट्टी आणि गुजरातमध्ये पाऊस होईल. दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता आहे.