आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-राष्ट्रवादीची छुपी युती, मोदी नेमका कोणाचा प्रचार करताहेत? राज ठाकरेंचा सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाजपने आयात केलेल्या 60 उमेदवारांनावरून भाजपवर सडकून टीका केली. याचबरोबर भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात छुपी असल्याचा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचा प्रचार करीत आहे की काँग्रेस-राष्ट्रवादीचा असा सवालही राज यांनी उपस्थित केला. शिवसेनेवर मात्र अधिक बोलण्यास टाळले.
राज ठाकरे म्हणाले, युती आणि आघाडी आता तुटली असली तरी त्याचे नियोजन, तयारी तीन महिन्यापूर्वीच झाली होती. या घटनेमागे शरद पवार व भाजपमधील बडे नेते यांचा हात आहे. अर्ज भरण्याच्या आधी दोन दिवस युती, आघाडी मोडून हे नेते महाराष्ट्राला मुर्ख बनवत आहेत. या सगळ्यांना बाजूला सारण्याची ही योग्य संधी आहे. हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. त्यापेक्षा माझ्या पक्षाला एकदा संधी देऊन तर बघा असे आवाहन राज ठाकरेंनी पुण्यातील मतदारांना केले.
भाजपवर हल्लाबोल करताना राज म्हणाले, भाजप सत्तेसाठी काहीही करू शकतो हे वेळोवेळी दाखवून दिले आहे. आताही 60 उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादीतील दिले आहेत. हाच भाजप आता शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागत आहेत. यांनी कधी शिवजयंती साजरी केली आहे का ती विचारा. मग आता छत्रपतींचा आशीर्वाद मागून कशाला मते मागता. आयात उमेदवार करूनही राज्यातील जनतेकडे बहुमत मागताने लाज वाटत नाही असा हल्लाबोल राज यांनी भाजपवर केला.
मोदींवर टीका करताना राज म्हणाले, मोदी हे अद्याप गुजराती मानसिकतेतून बाहेर आले नाहीत. राज्यातील भाजपचे नेते एवढे बोगस आहेत की त्यांना मोदींचा व त्यांच्या फोटोचाच आधार घ्यावा लागत आहे. पण हे मोदी काय महाराष्ट्राचा कारभार करायला येणार आहेत का असा सवाल उपस्थित करून राज यांनी भाजपला व महाराष्ट्राबद्दल काडीचीही तळमळ नसलेल्यांना कोणत्याही स्थितीत निवडून देऊ नका असे आवाहन केले.
काय म्हणाले राज ठाकरे पुण्यातील सभेत....
- अजित पवारांनी सिंचनात 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला- राज ठाकरे
- भाजपने विरोधीपक्ष असताना अनेक तडजोडी केल्या. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे 15 वर्ष सरकार टिकले- राज ठाकरे
- युती आघाडी तोडण्याचं अगोदरपासूनच ठरलं होतं हे सगळी जुळवाजुळव लोकसभेपासून होती - राज ठाकरे
- नरेंद्र मोदी नक्की कुणाचा प्रचार करतात ? भाजप की काँग्रेस, राष्ट्रवादीचा -राज ठाकरेंचा सवाल
- महाराष्ट्राचा विकास आराखडा घेऊन आलोय, एक संधी द्या मला- राज ठाकरे
- माझे सरकार आल्यास गोहत्या बंद करणार- राज ठाकरे