आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डीएसकेंना अडकवण्याचे अमराठी षड‌्यंत्र; गुंतवणूकदारांनी संयम बाळगावा- राज ठाकरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज ठाकरे - Divya Marathi
राज ठाकरे

पुणे- बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी हे यशस्वी मराठी उद्याेजक असून त्यांनी अातापर्यंत काेणालाही फसवलेले नाही. काही राजकीय अाणि अमराठी मंडळी त्यांना अडकवण्याचा पद्धतशीर प्रयत्न करत अाहेत. मात्र, डीएसके मराठी उद्याेजक असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी अाहे, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पुण्यात सांगितले.  


मुदत ठेवीदार अाणि फ्लॅटधारक यांची फसवणूक केल्यामुळे डी. एस.कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात अालेला अाहे. या पार्श्वभूमीवर डीएसके यांना पूर्वपदावर अाणण्यासाठी थाेडा वेळ द्यावा, असे अावाहन करण्यासाठी पुण्यात ठेवीदारांच्या बैठकीचे अायाेजन करण्यात अाले हाेते. याप्रसंगी राज ठाकरे यांनी ठेवीदारांशी संवाद साधला. त्याप्रसंगी पत्रकारांशी बाेलताना ते म्हणाले, डीएसके सध्या अार्थिक अडचणीत सापडलेले असून त्यांना मुंबई-पुण्यातील काही अमराठी व राजकीय मंडळी अडकवण्याचा प्रयत्न करत अाहेत. या व्यक्ती काेण अाहेत याबाबतची माहिती अापणास अाहे. राजकारण बाजूला ठेवून मराठी व्यावसायिकाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे अाहे, असे अावाहनही राज ठाकरे यांनी उपस्थित ठेवीदारांना केले.

 

पुढे स्लाईडद्वारे वाचा, डीएसके समूहातील चिंताग्रस्त गुंतवणूकदार आणि राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यान नेमके काय काय घडले....

बातम्या आणखी आहेत...