आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'टोल\'फोड प्रकरणी राज ठाकरेंविरोधात पुण्यात गुन्हे दाखल; 31 जानेवारीला अटक?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात 'टोल'फोड प्रकरणी पुणे जिल्ह्यातील राजगड आणि लोणी-काळभोर पोलिस ठाण्यात आज (मंगळवारी) गुन्हे दाखल करण्‍यात आला. राज यांच्यासह मनसेच्या पदाधिकार्‍यांवर दंगल घडवणे, अशांतता‍ निर्माण करणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. राज यांना येत्या 31 जानेवारीला अटक होण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज ठाकरे यांनी केल्या भाषणानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईसह राज्यातील टोलनाक्यांवर तोडफोड करून अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आजही अनेक ठिकाणी टोलफोड सुरुच आहे. मुंबईतील मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी वांद्रे-वरळी सी-लिंकवरील टोल नाक्याची तोडफोड केली. यामुळे पोलिसांनी मनसेचे वरिष्ठ कार्यकर्ते कप्तान मलिक यांच्यासह सुमारे 15 ते 20 कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

राज यांच्या भाषणाची चौकशी सुरु असून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी दिले आहेत.

दरम्यान, राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दोन दिवसांपासून मनसेसैनिकांनी केलेल्या 'कामगिरी'चे कौतुक केले आहे. आम्हाला अशा कार्यकर्त्यांवर सार्थ अभिमान वाटतो तसेच राज्यातील मंत्र्यांनी कंत्राटदारांकडून खाल्लेले पैसे परत द्यावेत. मगच आम्ही टोल तोडफोडीतील नुकसान देऊ, असे शर्मिला ठाकरेंनी ठामपणे सांगितले आहे. दोन दिवसांच्या घडामोडीनंतर सरकारने आता राज ठाकरेंवर कारवाईचे संकेत दिले आहेत.
गृहविभागाने राज यांनी केलेल्या भाषणातील विधाने तपासली जाणार असल्याचे सांगितले आहे. त्याबाबतचा अहवाल आल्यानंतर काय कारवाई करायची, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही कायदा सुव्यवस्था बिघडवणा-यांवर कडक कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनीही कारवाईचे संकेत दिले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आदी पक्षांनी याप्रकरणी राज ठाकरेंवर कारवाईची मागणी केली आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, राज ठाकरे यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप...