आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिळक, रंगारी वाद निरर्थक- राज ठाकरे, मुंबईत 21 सप्टेंबरला मनसेचा मेळावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सार्वजनिक गणेशोत्सवाच्या  शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात सुरू झालेला लोकमान्य टिळक आणि भाऊ रंगारी यांच्यातील वाद निरर्थक असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना मांडले. गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देऊन तो व्यापक करण्यातले लोकमान्य टिळक यांचे योगदान अविस्मरणीय आहे, असेही ठाकरे म्हणाले.
 
पुणे महानगरपालिकेच्या  प्रभागनिहाय पदाधिकाऱ्यांच्या  नियुक्त्यांच्या  संदर्भात राज ठाकरे पुण्यात आले आहेत. शिवाजीनगर परिसरातील अशोकनगर येथील क्लब हाऊसमध्ये  राज यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी  चर्चा व थेट संवाद केला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.   मनसेमधील  इच्छुुकांच्या  प्रत्येक सदस्याची  मी स्वत: मुलाखत घेत आहे. मुंबईत २१ सप्टेंबरला मनसेचा मेळावा आयोजित केला आहे. त्या वेळी पक्षाची कार्यकारिणी जाहीर करणार आहे, असे ठाकरे यांनी या वेळी सांगितले. २७ सप्टेंबरला पक्षाचे फेसबुक पेजही लाँच करण्यात येणार आहे.  
 
बातम्या आणखी आहेत...