आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोलनाक्यावर तोडफोड केल्याप्रकरणी राज यांच्यावर गुन्हा दाखल;टोल कायम राहणार - अजित पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/मुंबई/औरंगाबाद - टोलनाक्यावर तुडवातुडवी करण्याचे आवाहन करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह 17 जणांवर भोर तालुक्यातील राजगड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. यातील 15 जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.जी.संताने यांनी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. याशिवाय लोणी काळभोरमध्येही राज यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, मनसेवर कारवाईचे संकेत देतानाच आंदोलनातील नुकसानीची रक्कम निश्चित करून ती वसूल करण्यात येईल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यातच पैशांची कमतरता असल्याने टोल आवश्यक असून, यापुढेही टोल सुरूच राहील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी औरंगाबादेत स्पष्ट केले आहे.
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या टोल आंदोलनावरून राज यांच्यासह कार्यकर्त्यांवर दंगल घडवणे, अशांतता निर्माण करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गृहमंत्री पाटील यांनी टोल नाक्यांच्या सुरक्षेवर तातडीची बैठक घेतली. या वेळी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, कामगारमंत्री हसन मुर्शीफ आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. आंदोलकांवर कारवाईचे संकेत गृहमंत्री पाटील यांनी या वेळी दिले. दरम्यान, पुण्यातील आंदोलनात एका महिला कॉन्स्टेबलसह 5 कर्मचारी जखमी झाल्याचे सासवडचे फौजदार एस.जी. पाटील म्हणाले.
जालन्याजवळ नागेवाडी नाक्यावर जाळपोळ
दुस-या दिवशीही मंगळवारी मनसेचे टोलविरोधी आंदोलन सुरू राहिले. औरंगाबाद-जालना रोडवरील नागेवाडी नाक्यावर तोडफोड करून कार्यकर्त्यांनी तो पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राऊत यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल झाला. नाक्यावर केबिनच्या काचा, संगणकाचे प्रिंटर फोडण्यात आले. दुचाकीवरून आलेल्या कार्यकर्त्यांनंी पेटलेले टायर फेकून नाका जाळण्याचा प्रयत्न केला. मुंबईत वरळी सी-लिंकवरही मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.
नाक्यावरील कर्मचारी व पोलिसांनी प्रयत्न करून पेटलेले टायर विझवले. विशेष म्हणजे या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली. याप्रकरणी टोल व्यवस्थापक अविनाश रमेश पाटील यांच्या तक्रारीवरून मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राऊत, गजानन लाखोले, बद्री वाघ, कृष्णा जाधव, राम घोगरे यांच्याविरुद्ध तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक गजानन जायभाये करीत आहेत.
कॅबिनेट बैठकीत आज टोलवर धोरण ठरणार
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणही टोल आकारणी करू लागले आहे. टोलबाबतचे धोरण बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत निश्चित केले जाईल, असे अजित