आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निहलानी यांना राजा परांजपे सन्मान जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते राजा परांजपे यांच्या स्मृत्यर्थ राजा परांजपे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा राजा परांजपे सन्मान यावर्षी प्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी यांना जाहीर झाला आहे. 20 एप्रिलला पुण्यात होणा-या समारंभात या सन्मानाचे वितरण होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अर्चना राणे यांनी दिली. प्रतिष्ठानच्या वतीने कवी संदीप खरे, दिग्दर्शक रवी जाधव, अभिनेत्री उषा जाधव, गायिका बेला शेंडे आणि छायालेखक संजय जाधव यांनी तरुणाई सन्मानही प्रदान करण्यात येणार आहेत. यानिमित्त प्रतिष्ठानच्या वतीने राजा परांजपे यांच्या गाजलेल्या चित्रपटांचा महोत्सवही होणार आहे. त्यामध्ये जगाच्या पाठीवर, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, उनपाऊस, हा माझा मार्ग एकला या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच परांजपे यांच्या चित्रपटांतील लोकप्रिय गीतांचा विशेष कार्यक्रम होईल, ही सादर होणार आहे.


शासकीय उदासीनतेवर खेद
अनेक कलाकारांच्या नावाने विविध पुरस्कार, सन्मानांची रेलचेल उडवणाºया शासनाने राजा परांजपे यांच्या नावाकडे मात्र कायमच पाठ फिरवल्याचा आरोप अर्चना राणे यांनी केला. महत्त्वाच्या सर्व महोत्सव व कार्यक्रमांत राजाभाऊंच्या असाधारण चित्रकर्तृत्वाचा उल्लेखही केला जात नाही, याचा खेद वाटतो, असे त्या म्हणाल्या.