आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajasthan's Development Make Only By Bjp Vasundhararaje Sindia

राजस्थानचा विकास फक्त भाजपच करू शकतो - वसुंधराराजे सिंधिया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- व्हायब्रंट गुजरातप्रमाणे राजस्थानचा विकास फक्त भाजपच करू शकतो. अशोक गेहलोत यांच्या राजवटीला जनता कंटाळली आहे. त्यांना बदल हवा आहे. मात्र त्यासाठी विखुरलेल्या राजस्थानी बांधवांनी नोव्हेंबरमध्ये मातृभूमीला येऊन मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे भावनिक आवाहन राजस्थानच्या भाजप प्रदेशाध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया यांनी मंगळवारी केले.

राजस्थानच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याचे औचित्य साधून राजस्थान प्रवासी संघाच्या वतीने वसुंधराराजे यांचा तलवार आणि चुनडी भेट देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ‘मैं आपको पीले चावल देने के लिये ही आयी हूं’ असे उद्गारही त्यांनी काढले.

खासदार देवजी पटेल, प्रवक्त्या शायना एन्सी, मुंबई भाजपध्यक्ष राज पुरोहित, आमदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर यांच्यासह भाजपचे नगरसेवक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. प्रवासी संघाचे अध्यक्ष दलवीरसिंह चौहान तसेच राजस्थानातील आमदारही उपस्थित होते. शिंदे म्हणाल्या, पुण्याशी माझे नाते जुने आहे. आमचे पूर्वज महादजी शिंदे यांचे स्मारक येथेच आहे, हे एक माहेरचे नाते आणि राजस्थानातील 36 जातींच्या बांधवांनी मला चुनडी दिली, हे दुसरे नाते. यापूर्वी पुण्यातल्या बांधवांना न भेटताच मी निघून गेले होते, पण या वेळी ती चूक सुधारली आहे.
वीज गायब
मी रस्ते, पाणी आणि विजेचे वचन पूर्ण केले. 1.70 लाख कोटींची गुंतवणूक होणार होती, पण काँग्रेसचे सरकार येताच वीज गायब झाली व उद्योग पुण्या-मुंबईकडे गेल्याचे सिंधिया म्हणाल्या.