पुणे- 87 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या 3 जावेवारीपासून सासवड येथे सुरु होत असून, यासाठी दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांना निमंत्रण दिले आहे. रजनीकांत यांचे मूळ गाव पुरंदर तालुक्यातील असून, त्यांचे पूर्वज पुरंदरचे रहिवासी असल्याने त्यांना निमंत्रण देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मूळचे पुरंदर तालुक्यातील असलेल्या रजनीकांत यांच्या पूर्वज कोल्हापूरला गेले व त्यानंतर रजनी यांनी चेन्नईचा रस्ता धरला. सरकारी सेवेतील एक बस वाहक ते अभिनेता असा त्यांनी प्रवास केला. त्यापुढचा इतिहास तुम्हा-आम्हाला माहित आहेतच. रजनीकांत आज दक्षिणेतील सुपरस्टार तर आहेतच पण त्यांना तेथील जनतेने दैवत्व बहाल केले आहे.
सासवड येथे 3 ते 5 जानेवारी दरम्यान 87 वे मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळेच बुजुर्ग व देशभर लोकप्रिय अभिनेता असलेल्या रजनीकांत यांना निमंत्रण दिले आहे. याबाबतचे सविस्तर पत्र 18 डिसेंबरला पाठविण्यात आले आहे. मात्र रजनीकांत यांनी या साहित्य संमेलनाचे निमंत्रण स्वीकारले की नाही याबाबत माहिती उपलब्ध झाली नाही. मात्र ते येण्याची शक्यता अधिक असल्याचे संमेलनातील संयोजकांकडून सांगण्यात आले. ते येणार की नाही याची माहिती दोन-तीन समजेल असे सांगण्यात आले.