आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मक्लेश: सदाभाऊ खोत हा विषय संपलेला असून आता पुन्हा यावर बोलायला लावू नका- राजू शेट्‍टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड- पुण्याहून सुरु झालेल्या आत्मक्लेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आज (मंगळवारी) पिंपरी चिंचवडमधून सुरवात झाली. काल या यात्रेचा मुक्काम पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी येथील खंडोबा मंदिरात झाला. नंतर सकाळी आत्मक्लेश यात्रा मुंबईच्या दिशेने रवाना झाली.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठि शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आत्मक्लेश यात्रेचा आयोजन करण्यात आले आहे. 22 ते 30 में पर्यंत ही यात्रा मुंबईला धडकणार आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले आहे. सदाभाऊ खोत यांची उपस्थिति नसल्याबब्बत त्याना विचारले असता राजू शेट्टी म्हणाले की, सदाभाऊ खोत हा विषय संपलेला असून, आता पुन्हा मला यावर बोलायला लावू नका, अशी स्पष्ट भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी मांडली.

दरम्यान, पुण्याच्या महात्मा फुले वाड्यातून राजू शेट्टी यांनी काल सुरु केलेल्या आत्मक्लेश पदयात्रेकडे राज्यमंत्री आणि भाजपशी जवळीक साधलेले स्वाभिमानीचे नेते सदाभाऊ खोत यांनी पाठ फिरवली होती. आकुर्डी येथून पदयात्रेचा दुसरा दिवस सुरु झाला. मात्र तरीही खोत यात सामील न झाल्याने शेट्टी यांनी अखेर खोत यांच्यावर घणाघात केला. सदाभाऊ खोत हा विषय संपल्याने यापुढे फक्त शेतकर्त्यांबद्दल विचारा अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.  

पिंपरी चिंचवडमधून आत्मक्लेश यात्रा देहूरोडच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. पुढचा मुक्काम वड़गावमधील पूजा हॉटेलला राहणार आहे. त्या आधी आज अमरजाई मंदिर येथे दुपारच जेवण करुन पुढील 10 किलोमीटर च्या प्रवासाला 4 वाजताच्या सुमारास सुरवात होणार आहे. पिंपरी चिंचवडमधून आत्मक्लेश यात्रेला शिवसेनेकडून पाठिंबा दर्शविण्यात आला. आत्मक्लेश यात्रेला शिवसेने खासदार आप्पा बारणे आणि इतर शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा...
बातम्या आणखी आहेत...