आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर हसन मुश्रीफांना तुरुंगात जावे लागेल, राजू शेट्टींचा प्रतिटोला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- "कोल्हापूरजिल्हा बँकेच्या कारभाराची नार्को टेस्ट केली, तर तुम्हाला तुरुंगात जावे लागेल. तुम्ही मला शहाणपणा शिकवू नका,' असे खरमरीत प्रत्युत्तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांना दिले अाहे.
भाजपची मस्ती उतरवण्याची भाषा करणारे राजू शेट्टी मंत्रिपद आणि महामंडळाच्या तुकड्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर लोटांगण घालत असल्याची टीका मुश्रीफ यांनी साेमवारी केली होती. या टीकेमुळे संतापलेल्या शेट्टी यांनी मुश्रीफ यांच्या विरोधात दिल्लीतून पत्रक काढले आहे. कागल शाखेतील कोटी ८६ लाख रुपयांची रक्कम मुश्रीफ यांनी हडप केली असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.

"कागल शाखेतील गायब झालेल्या रकमेसंदर्भात मुश्रीफ यांची नार्को टेस्ट केल्यास सत्य बाहेर येईल. जिल्हा बँकेतील घोटाळ्याची चौकशी लपवण्यासाठी आणि सत्ता आणण्यासाठी मुश्रीफांनी कोणाचे पाय धरले, हे सगळ्यांना माहिती आहे. हिंमत असेल तर तुम्ही सहकारमंत्री मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करावे,' असे आव्हान शेट्टी यांनी दिले. गेल्या पंधरा वर्षांतल्या शरद पवारांच्या धोरणांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या पवारांची वकिली मुश्रीफांनी करू नये, असा टोला शेट्टी यांनी लगावला.

स्वाभिमान गहाण नाही
शेतकऱ्यांनीमला सांगितल्यास मुख्यमंत्रीच काय पंतप्रधानांच्या घरासमोर जाऊनही मी आंदोलन करेन. सत्तेसाठी मी माझा स्वाभिमान गहाण टाकलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र त्यांच्या घोटाळ्यांची चौकशी होऊ नये म्हणून भाजपशी हातमिळवणी करत आहे. म्हणूनच भाजपने मागताही राष्ट्रवादी पाठिंबा देऊन मोकळी झाली, असे शेट्टी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...