आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात पोस्टकार्डची राखी बांधून पोस्टमन काकांसोबत राखीपौर्णिमा साजरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- निरंजन सेवाभावी संस्थेच्या सर्व महिला भागिनींनी रक्षाबंधननिमित्त एक सामाजिक जाणिव ठेवून पोस्टकार्डची राखी बांधून पोस्टमन काकांसोबत राखीपौर्णिमा साजरी केली.  
 
सिद्धीता गटातर्फे आयोजन
सायकल चालवित येणारा खाकी रंगाच्या कपड्यातील पोस्टमन काका, हे चित्र काळाच्या ओघात हरवतंय. संवादाची साधने नसणाऱ्या काळात पोस्टमन काकांमुळेच आपला प्रेम, जिव्हाळा आपल्या स्नेहीजनांपर्यंत पोहोचविणे शक्य होते. तंत्रज्ञानाच्या युगात त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी यासाठी निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे पोस्टमनकाकांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. त्यांच्या आयुष्यातील मुख्य घटक असणाऱ्या पोस्टकार्डचीच आगळीवेगळी राखी बांधून रक्षाबंधन साजरे झाले.

जीपीओ मुख्य कार्यालयात आयोजित पोस्टमन काकांसोबत रक्षाबंधनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व पोस्टमनकाकांना भेटवस्तू देखील देण्यात आल्या तसेच त्यांनी पोस्टकार्डवर संदेश देण्यात आला.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा फोटो...पोस्टकार्डची राखी बांधून पोस्टमन काकांसोबत राखीपौर्णिमा साजरी
 
बातम्या आणखी आहेत...