आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात वाहतूक पोलिसांचं अनोखं रक्षाबंधन, महिला पोलिसांनी वाहनचालकांना बांधल्या राख्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड- वाहतूक पोलिसांनी अनोखे रक्षाबंधन साजरे केले आहे. विशेष म्हणजे यात वाहतुकीचे नियम डावलणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक महिला पोलिसांनी आणि पुरुष पोलिसांनी राख्या बांधल्या.

बहीण भावाला राखी बांधून ज्याप्रकारे भावाकडून रक्षणाची अपेक्षा असते, त्याचप्रमाणे वाहतूक पोलिसांनी वाहनचालकाना राख्या बांधून नियमांचे रक्षण आणि उल्लंघन करू नये यासाठी प्रेरित केले. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करू नये, यासाठी शुभेच्छा रुपी नियमावलीच कार्ड देण्यात आले आहे. तब्बल पाच हजार राख्या आणि पाच हजार शुभेच्छा रुपी वाहतूक नियमावलीचे कार्ड देण्यात आले.
पिंपरी चिंचवड मधील रक्षक चौक, वाकड वाय जंक्शन, तापकीर चौक, शिवार गार्डन, गोविंद गार्डन या वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी रक्षा बंधन साजरा करत नियमांना पायदळी तुडवणाऱ्या वाहनचालकाना कार्ड देण्यात आलं.आता तरी वाहनचालक नियम पाळतील अशी आशा बाळगुयात. सर्व खर्च वाहतूक पोलिसांनी स्वतःच्या खर्चातून केला आहे. वाहतूक नियमन जनजागृती अभियान पुणे पोलिस यांच्या सहयोगाने सांगवी वाहतूक पोलिसांनी हा सण साजरा केला. यावेळी शहर वाहतूक विभागाचे अधिकारी अशोक मोराळे, राजेंद्र भामरे, पोलिस निरीक्षक किशोर मसवडे आणि सांगवी विभागाचे सर्व अधिकारी तसेच कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला होता.

फोटो पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...