आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सैन्यात भरती व्हा, देशी दारुऐवजी इंग्लिश दारु प्यायला मिळेल; रामदास आठवले यांचे विधान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- तरुणांनी सैन्यात जावे तिथे चांगले खाण्यासोबतच परदेशी दारुही प्यायला मिळेल, असे अजब विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केले. 
 
दलित समाजाला सैन्यात आरक्षणाची मागती करताना त्यांनी हे  विधान केले. बेरोजगार राहून हातभट्टीची देशी दारु पिण्याऐवजी सैन्यात भरती व्हावे, तिथे चांगलं खाणं इंग्रजी दारु प्यायला मिळेल, असेही आठवलेंनी सांगितले. आठवले म्हणाले की, लष्करात आरक्षण द्या. इथे बरोबर खायला मिळत नाही, प्यायला मिळत नाही. मिलिटरीमध्ये चांगलं खायला, प्यायला मिळतं. रम, ब्रॅण्डी मिळते.याशिवाय सैन्यात मरण्यासाठी भरती होतात हा समज चुकीचा असल्याचे आठवलेंनी सांगितले. दररोज हार्टअटॅक आणि रस्ते अपघातात मरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. फक्त सैन्यात लोक  मरतात हा गैरसमज आहे, असेही आठवले म्हणाले.
 
सैन्यात दलित तरुणांना आरक्षणावर जोर देताना आठवले म्हणाले की, दलित लढाऊ आहेत. ते सैन्यात भरती झाले तर देशासाठी मोठे योगदान देऊ शकतील. यासाठी मी स्वत: वैयक्तिकरित्या प्रयत्न करेन.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 
 
 
बातम्या आणखी आहेत...