आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramdas Athawale News In Marathi, Maharashtra Assembly Election 2014

लोणावळ्यात ‘रामदास\' वगनाट्याने मतदार हसून-हसून बेजार, राजला लगावले शाब्दिक फटकारे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राजकीय नकलांमधून विरोधकांची टोपी उडवणा-या राज ठाकरे यांना रामदास आठवले यांनी खास ‘रामदासी प्रसाद' देऊ केला. राज यांनी आठवले यांची नक्कल करून हशा मिळवला होता. त्याची सव्याज परतफेड आठवलेंनी केली. "मेरी मत करो कोई भी नक्कल, नही तो मै कर दुंगा तेरा टक्कल,’ अशी जबरदस्त दमबाजी आठवले यांनी राजना केली. आठवले बेडूकउड्या मारत असल्याचे राज म्हणाले होते.“मेरी ‘ढाण्या वाघ' की उडी होती है. अगर मेरी उडी तेरे नरडे पर आ जाएगी, तो क्या होगा देख ले,'' असा प्रचंड विनोदी इशारा आठवलेंनी दिला तेव्हा श्रोते हसून बेजार झाले.

रिपाइंचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले मावळ तालुक्यात (जि. पुणे) भाजप उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलत होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व्यासपीठावर असल्याने त्यांना हिंदी भाषण करण्याचा मोह आवरला नाही. आठवले यांच्या मराठीमिश्रित हिंदीतले फटकारे ऐकून शहा यांनाही हसू आवरले नाही. मतदार श्रोते तर हसून गडाबडा लोळायचेच तेवढे बाकी होते.

"अमित शहाजी, ये मावल तालुका छत्रपती शिवाजी महाराज के स्पर्श से पावन हुआ तालुका है. जिस तरह शिवाजी महाराजने दुश्मनोंको ‘चारीमुंड्या' चीत किया, उसी तरह अपने उपर जिम्मेदारी आयी है. काँग्रेस और राष्ट्रवादी को ‘चारीमुंड्या' चीत करने की,’ अशी धमाकेदार सुरुवात आठवलेंनी केली. ते म्हणाले, "ये राष्ट्रवादीवाले गरीब किसानों पर फायरिंग करते है. इनको फायरिंग करनी है तो जा के पाकिस्तान के बॉर्डर पर फायरिंग करो. वहा तो फायरिंग नही करते और यहा फायरिंग करते है. ’

आठवले यांनी राज ठाकरेंना लक्ष्य केले. "एक कोई नेता है वो नक्कल करने में बहुतही एक्स्पर्ट है. वो कहता है आठवले ‘बेडूक उडी' मारते है. लेकिन मेरी ‘बेडूक उडी' नही है, मेरी ‘ढाण्या वाघ' की उडी होती है. ये उडी ‘बिबळ्या वाघ' की उडी होती है. अगर मेरी ‘उडी' तेरे ‘नरडे' पर आ जाएगी, तो क्या होगा देख ले.

‘राज'ला टोला आणि चिमटा
"और वो एक नेता बोल रहा था की आठवले को डेप्युटी सीएम बनाने का ऐलान जब मैने सुना तो मुझे हसी आयी.... अरे भाई, तुमको कायको हसी आयी,’ असा प्रश्न आठवले यांनी राजना केला. "लेकिन मैने जब सुना वो नेता बोलता है की महाराष्ट्र मेरे हात मे दे दो, मै सोना कर दूंगा. नाशिक मे सत्ता दिया. ढाई साल मे नाशिक का कोलसा किया,’ असा टोला त्यांनी लगावला. "अब इनकी चार- पांच सीटे आयेगी और ये बोलते है की मुझे मुख्यमंत्री करो. जब मैने ये सुना तब मुझे रोने के लिये आया,’ असेही ते म्हणाले.

‘उद्धव'लाही झटका
उद्धव ठाकरे यांनाही आठवलेंनी झटका दिला. ते म्हणाले,"जब उद्धव ठाकरे ने मुझे डेप्युटी सीएम बनाने का आश्वासन दिया तो मैने बोला, भाई, आपही सीएम बनते है की नही मालूम नही तो मै कैसे बनूंगा?' डेप्युटी सीएम के चक्कर मे तुम्हारे साथ आउंगा तो मुझे इधर भी कुछ नही मिलेगा, उधर भी कुछ नही मिलेगा. इसलिए मैने सोचा, दिल्ली मे मोदीजी की सरकार है तो दलितों का भला होगा और इधर आया.