आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपशब्द काढले तर मराठी साहित्य संमेलन उधळून लावू - रामदास आठवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात श्रीपाल सबनीस यांनी पुन्हा अपशब्द काढले तर रिपाइं कार्यकर्ते पिंपरीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उधळून लावतील, असा इशारा रिपाइंचे अध्यक्ष व खासदार रामदास आठवले यांनी शनिवारी दिला आहे.
पिंपरी- चिंचवडमधील उद्योजक अमित मेश्राम यांची रिपब्लिकन उद्योग सेलच्या राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

आठवले म्हणाले की, गोध्रा हत्याकांड व गुजरातमधील दंगल याचा रिपाइंने त्या वेळी निषेध केला आहे. ‘गोध्रा’चा कोळसा उगाळण्यात अर्थ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परिवर्तनवादी व समतावादी भूमिका स्वागतार्ह आहे. "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेले पवित्र संविधान हाच माझा पवित्र ग्रंथ आहे. अशोक चक्रांकित तिरंगा झेंडा हाच माझा झेंडा आहे,’ हे मोदींनी लोकसभेत प्रथम केलेल्या भाषणात सांगितले आहे. ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी मोदींबद्दल केलेल्या विधानाबाबत भाजपची जी भूमिका आहे तीच रिपाइंची आहे. त्यामुळे सबनीस यांनी पुन्हा जर मोदींबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य केले तर आमचे कार्यकर्ते साहित्य संमेलन उधळून लावतील.

‘आठवले’ यांना पर्याय म्हणून खासदार अमर साबळे यांना भाजप पुढे आणत आहे काय, या प्रश्नावर आठवले म्हणाले की, रामदास आठवले रिपाइंचे अध्यक्ष आहे. महाराष्ट्रात आठवलेला अजून पर्याय कोणी ठरू शकत नाही. मी मंत्रिपदाच्या मागे धावत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर रिपाइंला केंद्रात मंत्रिपद मिळाले नाही. म्हणून आंबेडकरवादी जनतेची प्रबळ इच्छा आहे की, मला केंद्रात मंत्रिपद मिळावे. याबाबत अमित शहा यांनी मला आश्वासन दिले आहे. ‘डान्सबार’बाबत ते म्हणाले, पोलिसांची पगारवाढ केली तर हप्तेखोरी बंद होईल.
बातम्या आणखी आहेत...