Home »Maharashtra »Pune» Ramdas Athawle On Ramnath Kovind In Pune

'भाजपने विरोधकांचे तोंड बंद केले', आठवले म्हणाले- कोविंद यांना पाठिंब्यासाठी उद्धव ठाकरेंना भेटणार

दिव्य मराठी वेब टीम | Jun 19, 2017, 17:21 PM IST

  • केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजप दलित विरोधी नसल्याचे पुण्यात सांगितले.
पुणे - केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार घोषित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. दलित उमेदवार दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचेही त्यांनी आभार मानले आहे.
पुण्यात पत्रकारांशी वार्तालाप करताना आठवले म्हणाले, राष्ट्रपती पदासाठी बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा करुन भाजप दलित विरोधी नसल्याचे मोदी आणि शहा यांनी दाखवून दिले आहे.

शिवसेनेने अजूनही आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याचे विचारता आठवले यांनी मी स्वतः उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना बोलणार असल्याचे ते म्हणाले.
रामदास आठवले म्हणाले, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचीही हिच भूमिका होती. भीमशक्ती-शिवशक्ती हा प्रयोग बाळासाहेबांनी याच हेतूने केला होता.
भाजपने दलित उमेदवार देऊन विरोधकांची तोंडे बंद केल्याचेही आठवले म्हणाले. राष्ट्रपती निवडणुकीसाठी आवश्यक असलेले पूर्ण बहुमत एनडीएकडे नसल्याचे सांगत छोटे पक्ष पाठिंबा देतील अशी अपेक्षा आठवलेंनी व्यक्त केली.

Next Article

Recommended