आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदीमय झाले तरच पवार राष्ट्रपती, रामदास अाठवले यांचे भाकित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - राष्ट्रपतिपदाची निवडणूक जशी जवळ येईल तशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उमेदवारीबाबत चर्चा रंगत आहे. पवारांना राष्ट्रपती होण्यासाठी लोकशाही आघाडीचा घटक व्हावे लागेल. पवार मोदीमय झाले तरच ते राष्ट्रपती  होऊ शकतील, असे भाकित केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांनी बुधवारी बारामतीत पत्रकारांशी बाेलताना वर्तवले.
 
आठवले म्हणाले, आजवरचा इतिहास पाहता विरोधी पक्षाचा राष्ट्रपती कधीच झाला नाही. विरोधकांची मोट बांधून राष्ट्रपतिपदी विराजमान होणे पवारांना शक्य नाही. ते देशातील कर्तबगार राजकारणी आहेत. मात्र, सद्य:स्थितीत  ते फक्त मोदींच्या साथीने राष्ट्रपती होऊ शकतात. उत्तर प्रदेशात दलितांच्या पाठिंब्यावर भाजप सत्तेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...