आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदेव बाबा - संजय दत्तच्या भेटीचा ‘याेगा’याेग, कैद्यांना बाबांनी दिले याेगाचे धडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - याेगगुरू रामदेवबाबा यांनी गुरुवारी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात जाऊन तेथील कैद्यांना याेगाचे धडे दिले. याच कारागृहात शिक्षा भाेगत असलेला अभिनेता संजय दत्त याच्या भेटीचा ‘याेग’ही रामदेव बाबांनी जुळवून अाणला. संजयने रामदेव यांचे अाशीर्वाद घेऊन ‘माझ्यासाठी प्रार्थना करा,’ अशी विनंती केली. दाेघांमध्ये सुमारे पाच ते दहा मिनिटे चर्चा झाली.
या वेळी महाराष्ट्र कारागृहाचे अपर पाेलिस महासंचालक डाॅ.भूषणकुमार उपाध्याय, पाेलिस महासंचालक मीरा बाेरवणकर, कारागृह पश्चिम विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे, येरवडा कारागृह अधीक्षक यू. टी.पवार उपस्थित हाेते. पत्रकारांशी बाेलताना रामदेव म्हणाले, ‘संजय दत्त हा कारागृहातील इतर कैद्यांसारखा कैदी असून ताे कारागृहाच्या शिस्तीचे पालन करत अाहे. कारागृहाचे िनयम, मर्यादा पालन याची जबाबदारी त्याला माहीत असल्याचे जाणवले. संजय अगाेदरपासूनच याेगा करत असून अाम्ही अात्मीयतेने भेटलाे. माझी अाेळख पूर्वीपासून अाहे. कारागृहात असल्याने त्याच्यावरील प्रेम कमी हाेत नाही.’

पाकवर विश्वासच नाही
पठाणकाेट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विचारले असता रामदेव म्हणाले, ‘पाकिस्तानमधील लाेक चांगले अाहेत. मात्र, काहीवेळा त्यांचा राग अनावर हाेताे. हा राग कमी करण्यासाठी त्यांनी याेगा अभ्यास शिकणे गरजेचे अाहे. अतिरेकी मसूद अजहरला पाकने अटक केली असली तरी हा केवळ दिखावा अाहे. पाकवर विश्वास ठेवता येणारच नाही. पाकमध्ये अणुबाॅम्ब असल्यामुळे त्यांना घाबरण्याची गरज नाही. तेथील दहशतवाद्यांचे तळ नष्ट करावेत. सीमेवर त्यांनी दाेन जवानांचे शीर कापले तर अापण दहा कापायला हवेत’, असे ते म्हणाले.