आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गतिमान सरकार ही सामूहिक जबाबदारी- नारायण राणे, महायुतीवरही टीकास्त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- गतिमान कारभार करणे ही एका कोणीची जबाबदारी नसून ती सामूहिक जबाबदारी असते असे सांगत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी प्रथमच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची बाजू घेतली. याचबरोबर महायुती म्हणजे एक ना धड भारावर चिंध्या असे म्हणत टीकास्त्र सोडले.
नारायण राणे हे पंढरपूरात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केले. राणे म्हणाले, राज्य सरकार लवकरच वीजेचे दर 10 ते 20 टक्क्यांनी कमी करणार आहे. तसेच मराठा आरक्षणाचा अहवाल 28 फेब्रुवारीआधी घेण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीवर सातत्याने टीका करीत असल्याबाबत प्रश्न विचारला असता राणे म्हणाले, गतिमान सरकार चालवणे असणे ही सामूदायिक जबाबदारी असते. ती कोणा एका मंत्र्यांची किंवा मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही. महायुतीत आता पाच पक्ष झाले आहेत यावर बोलताना राणे म्हणाले, महायुतीत कितीही पक्ष सामील झाले तरी एक ना धड भारावर चिंध्या अशी त्यांची अवस्था आहे.