आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारी समित्यांवर काम करणे हा तर मूर्खपणाच, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘राज्यसरकार आणि सरकारचे साहित्य संस्कृती मंडळ मराठी भाषेसाठी काहीही काम करत नाही. प्रामाणिकपणे आपले काम करूनही एकूण काम पुढे सरकत नाही. त्यामुळे सरकारी समित्यांवर काम करणे हा मूर्खपणा ठरत आहे’, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक, ‘ताम्रपट’कार रंगनाथ पठारे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
‘यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर राज्यव्यवस्थेत सांस्कृतिक आस्थाच कमी होत गेली. सध्या साहित्य संस्कृती मंडळासाठी ठराविक निधी आणि साहित्य संमेलनासाठी २५ लाख रुपये दिले, की आपले सांस्कृतिक कार्य संपले, अशीच सरकारची भूमिका आहे. मी स्वत: साहित्य संस्कृती मंडळावर काम केले. हे अनुभवाचे बोल आहेत. महत्त्वाच्या बैठकांनाही अधिकारी उपस्थित राहत नाहीत. ते कारकुनांना पाठवतात. खरे तर साहित्य, संस्कती, भाषा या क्षेत्रात सरकारला नेमकेपणाने काम करणे शक्य आहे, याविषयीची सविस्तर योजना मी सादर केली होती. पण दुर्दैवाने ती केराच्या टोपलीत गेली’, अशा शब्दांत पठारे यांनी टीकास्त्र सोडले.
बातम्या आणखी आहेत...