आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीरांगणा राणी लक्ष्मीबाईंचे महाराष्ट्राशी आहे हे नाते, कदाचित तुम्हालाही माहिती नसतील या गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/कोल्हापूर- वीरांगणा झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका तांबे होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता.

 

 

धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणाऱ्या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत नानासाहेब पेशवे, जयाजी शिंदे, लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातही प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.
लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले.

 

 

 

 

राणी लक्ष्मीबाई बाबत असे अनेक फॅक्टस् आहेत जे लोकांना खरे वाटतात पण इतिहासकारांच्या मते ते पूर्णपणे खोटे आहेत. राणी लक्ष्मीबाईच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्याशी संबंधित अशीच काही महत्वाची माहिती देणार आहोत.

 

 

लग्नाच्या वयाबाबतही बोलले गेले खोटे
- राणी लक्ष्मीबाईची जन्मतारीख 19 नोव्हेंबर 1835 मानली जाते. 
- इंग्रजांशी लढताना वयाच्या 23 व्या वर्षी त्यांना हौतात्म्य आले होते असे म्हटले जाते. 
- अनेक इतिहासकार याला सत्य मानत नाहीत. 
- 'झांसी क्रांति की काशी' पुस्तक लिहिणारे इतिहासकार ओमशंकर असर यांच्या मते 1835 मध्ये राणीचा जन्म झाल्याचा दावा चुकीचा आहे. झांशीचे राजा गंगाधर राव यांच्याशी झाशीच्या राणीचा विवाह 1842 मध्ये झाला होता. जर त्यांचा जन्म 1835 मध्ये झाला तर मग त्या विवाहावेळी केवळ 7 वर्षांच्या होत्या का? 
- राणीने लग्नापूर्वीच तलवारबाजी आणि घोडेस्वारी शिकली होती. एवढ्या कमी वयात ते शिकणे कठीण वाटते.
 
 
सत्य काय..
- ओमशंकर असर यांच्या मते, राणीचा जन्म 19 नोव्हेंबर 1827 ला झाला होता. 
- विवाहावेळी त्या 15 वर्षांच्या होत्या. 
- हौतात्म्य आले त्यावेळी त्यांचे वय जवळपास 31 वर्षे होते.
 
 
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या झाशीच्या राणीबाबतच असेच दावे आणि प्रतिदावे...

 

 

बातम्या आणखी आहेत...