आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे जिल्ह्यात अल्‍पवयीन मुलीवर बलात्कार करून खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पाचवीत शिकणा-या अकरावर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील यवतजवळील खुटबाव या गावात उघडकीस आली आहे. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अद्याप याबाबत कोणाला अटक करण्यात आलेली नाही. साक्षी शहाजी मांडरे असे मृत मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी ही खुटबाव येथील भैरवनाथ विद्यालयात पाचव्या इयत्तेत शिकत होती. गुरुवारी ती परीक्षेकरिता शाळेत गेली होती. तिचे वडील तिला घेण्यासाठी गेले, मात्र परीक्षा लवकर सुटल्याने साक्षी एकटीच घरी गेल्याचे त्यांना कळले. त्यामुळे ते तसेच घरी आले. मात्र, घरी आल्यावर साक्षी परत आलीच नसल्याचे समजले. त्यामुळे वडील काळजीत पडले.

कुटुंबीयांनी साक्षीचा शोध सुरू केला असता गावाजवळील एका उसाच्या शेतात तिचा मृतदेह सापडला. श्वानपथकाने मारेक-यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आले नाही. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.बी.चव्हाण पुढील तपास करत आहे.