आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातील गुलटेकडी परिसरातील झोपडपट्टीत एका दहा वर्षीय मुलीचा 30 वर्षीय नराधमाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजू आसूदेव असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. राजूने मुलीला झोपडपट्टीतील एका खोलीत नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केले. तसेच तिने याला विरोध केला असता लाकडाने बेदम मारहाण करून याबाबत कोणालाही सांगितल्यास ‘तुला मारून टाकीन’ अशी धमकी दिली. घटनेनंतर मुलीने झालेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी राजूला अटक करण्यात आली. तसेच मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घोरपडीगाव एटीएममधून पाच लाख लंपास
पुण्यातील घोरपडीगाव येथे कवडे रस्त्यावरील आयडीबीआय बँकेच्या एटीएममधून एका भामट्याने पाच लाख रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी साहिल सेठ यांनी अज्ञात आरोपीविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी रात्री आरोपीने मशीनचा बनावट एटीएम पासवर्ड टाकून पाच लाख रुपये लांबवले. शनिवारी सकाळी सुरक्षा रक्षक साफसफाई करण्यासाठी आला असता हा प्रकार उघडकीस आला. गेल्या काही दिवसांत पुण्यात एटीएम फोडीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे यात मातब्बर गुन्हेगारांचा सहभाग असल्याचा अंदाज पोलिस वर्तवत आहेत.