आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीर्थक्षेत्र अाळंदीत चाैथीच्या मुलीवर कीर्तनकाराकडून लैंगिक अत्याचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- तीर्थक्षेत्र अाळंदीत कीर्तनकार म्हणून वावर असणाऱ्या एका व्यक्तीने पुरंदर तालुक्यातील रिसे गावात बालसंस्कार शिबिर अायाेजित करून साेलापूर येथील चाैथीत शिकणाऱ्या एका चिमुरडीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी जेजुरी पाेलिसांनी अनिल सूर्यकांत हांडे या अाराेपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली अाहे. दरम्यान, हांडे याला न्यायालयात हजर केले असता त्याला पाेलिस काेठडी सुनावण्यात आली.

याप्रकरणी पीडित मुलीच्या अाजाेबांनी अाराेपीविराेधात तक्रार दाखल केली अाहे. अनिल हांडे याने स्वत: कीतर्नकार, मृदंग विशारद असल्याची जाहिरात करून रिसे येथे शाळकरी विद्यार्थ्यांसाठी २५ िदवसांचे बालसंस्कार शिबिर मे रोजी आयोजित केले. त्यासाठी ११०० रुपये शुल्कही त्याने अाकारले. त्यानुसार १२ ते या वयाेगटातील १७ मुले-मुली शिबिरात सहभागी झाले. यात दहावर्षीय पीडित मुलगीही सहभागी झाली होती. दोन दिवसांपूर्वी महाराजाने पीडित मुलीस अध्याय वाचन करण्यास आपल्या खाेलीत बाेलवले. त्यानंतर त्याने मुलीवर अमानुषपणे अत्याचार केले. तसेच याप्रकरणी कुणालाही माहिती दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली.