आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी चिंचवडमध्ये 46 वर्षीय महिलेवर नाराधामाने घरात घुसुन केला बलात्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड- एका 46 वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री 12 च्या सुमारास चिखली येथे ही घटना घडली आहे. जयभीम भालेराव असे नाराधमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरातील भीमशक्तिगगर येथे  ही घटना घडली आहे , मध्यरात्रीच्या सुमारास पीडितेच्या घरी कुणी नव्हते. याचा फायदा घेत आरोपीने घरात घुसून महिलेवर बलात्कार केला. पीडितेचा मुलगा घरात आला असता त्यालाही आरोपीने बेदम मारहाण केली. नंतर आरोपीने तेथून पळ काढला.

पोलिसांनी आरोपी जयभीम भालेराव याला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास निगड़ी पोलिस करत आहे निगडी पोलिस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...