आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकानमालकाचा युवतीवर वारंवार बलात्‍कार, दम देऊन घडवला गर्भपात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - गोळ्या बिस्‍कीट, खेळणी व इतर किरकोळ विक्रीच्‍या दुकानात नोकरी देतो, असे आमिष दाखवून एका दुकानाच्‍या मालकाने 19 वर्षीय युवतीवर वारंवार बलात्कार केला, त्‍यानंतर ही युवती गर्भवती राहिल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे.
कामाच्‍या शोधात होती तरूणी
ही तरूणी कामधंद्याच्‍या शोधात होती. तिची गरज लक्षात घेऊन एका दुकानदाराने तिला नोकरी देतो असे आमिष दाखवले व वारंवार तिच्‍यावर बलात्कार केला. पीडित तरूणीच्‍या शेजारी असलेल्‍या एका युवतीचा या प्रकरणात सहभाग होता. ही बाब कुणाला सांगू नको असा तिने दम दिला.
पुढे ही तरुणी गरोदर असल्याचे समजताच दुकानमालकाला घाम फुटला. त्‍याने शेजारच्‍या तरूणीच्‍या मदतीने पीडित युवतीला बुधवार पेठेत नेले. तेथील एका हॉस्‍पिटलमध्‍ये जबरदस्तीने गर्भपात घडवला. पीडित तरुणीने याबाबत मानवाधिकार कार्यकर्तीची भेट घेतली. घडलेला प्रकार सांगितला. त्‍यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, कसा घडला हा धक्‍कादायक प्रकार..