आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार प्रकरणात रोहित टिळक यांना अटकपूर्व जामीन मंजूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- बलात्कार प्रकरणात रोहित टिळक यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. विधी क्षेत्रात उच्च पदावर काम करणाऱ्या एका महिलेचे शोषण केल्याच्या आरोपावरून पुण्यातील काँग्रेस नेते रोहित टिळक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित टिळक यांनी आपली आर्थिक फसवणूक केल्याची तक्रारही  महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात दिली होती.
 
पीडित महिला मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत असून, एका केसच्या अनुषंगाने तिची रोहित टिळक यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. तसेच पीडित महिलेकडून वारंवार पैसेही उकळण्यात आले. रोहित यांच्याकडून होणाऱ्या जाचामुळे सदर महिलेने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आरोपीच्या कुटुंबीयांकडूनही संबंधित महिलेला त्रास देण्यात आला. त्यामुळे पीडित महिलेने ८ जुलै रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
बातम्या आणखी आहेत...