आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित टिळकांना मंजूर करण्यात आलेल्या अंतरिम जामिनावरील सुनावली पुढे ढकलली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहित टिळक यांना मंजूर करण्यात आलेल्या अंतरिम जामिनावरील सुनावणी कोर्टाने 8 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. - Divya Marathi
रोहित टिळक यांना मंजूर करण्यात आलेल्या अंतरिम जामिनावरील सुनावणी कोर्टाने 8 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे.
पुणे- लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याच्या प्रकरणात अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहित टिळक यांना मंजूर करण्यात आलेल्या अंतरिम जामिनावरील सुनावणी कोर्टाने 8 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. रोहित टिळकांविरोधात 17 जुलैला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
 
बलात्कार, अनैसर्गिक संभोग आणि मारहाणीचा आरोप
रोहित टिळक यांनी लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. गेल्या दहा वर्षांपासून ही महिला आपल्या पतीपासून वेगळी राहत आहे. पीडित महिला आणि रोहित टिळक यांची दोन वर्षापूर्वी एक कार्यक्रमादरम्यान ओळख झाली होती. त्यानंतर रोहित टिळक यांनी लग्नाचे आमिष दाखवत वारंवार बलात्कार, अनैसर्गिक संभोग आणि मारहाण केल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे.
 
रोहित टिळकांनी लढवली होती बापटांविरोधात निवडणूक
रोहित टिळक यांनी 2009 आणि 2014 साली गिरीश बापट यांच्याविरुध्द कसबा मतदार संघातून काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवली होती.
बातम्या आणखी आहेत...