आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: काँग्रेस नेते रोहित टिळकांवर बलात्काराचा गुन्हा; पीडित महिला हायकोर्टात वकील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- विधी क्षेत्रात उच्च पदावर काम करणाऱ्या एका महिलेचे शाेषण केल्याच्या अाराेपावरून पुण्यातील काँग्रेस नेते रोहित टिळक यांच्याविराेधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात अाला. राेहित टिळक यांनी अापली अार्थिक फसवणूक केल्याची तक्रारही सदर महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात दिली अाहे. 

पीडित महिला मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत असून, एका केसच्या अनुषंगाने तिची रोहित टिळक यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. तसेच पीडित महिलेकडून वारंवार पैसेही उकळण्यात आले. राेहित यांच्याकडून हाेणाऱ्या जाचामुळे सदर महिलेने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अाराेपीच्या कुटुंबीयांकडूनही संबंधित महिलेला त्रास देण्यात आला. त्यामुळे पीडित महिलेने ८ जुलै रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.