आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रविद्येच्या नावाखाली महिलेवर बलात्कार, भाेंदूबाबावर गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- काेंढवा-खुर्दपरिसरात एका भामट्याने भोंदूगिरी करत एका ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार केला. आपल्याला आत्मा बोलावण्याची विद्या अवगत असून त्याचा वापर करून चांगली नाेकरी मिळवून देऊ, असे आमिष दाखवत भामट्याने महिलेला आपल्या जाळ्यात ओढले होते.
पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून कोंढवा पोलिसांनी अशाेक नारायण घाटगे (रा. मार्केट यार्ड, पुणे) या भाेंदूबाबाविराेधात गुन्हा नोंदवला आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित महिला दुकान चालवत होती. मात्र, त्यात अपेक्षित यश येत नसल्याने ती नोकरीच्या शोधात होती. दरम्यान, तिच्या ओळखीचाच असलेल्या अशाेक घाटगेने तिला आपल्या जाळ्यात ओढले.
अापल्याला कोणत्याही व्यक्तीची आत्मा बोलावण्याची विद्या अवगत आहे. त्यानुसार आपण चांगली नोकरी पैसा मिळवून देऊ शकतो, असे भोंदूबाबाने पीडित महिलेस सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवत महिलेने होमहवनही केले. दरम्यान, भोंदूने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत सदर प्रकरणाची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने अखिल भारतीय जाणीव संघटनेच्या महिला अन्याय अत्याचार निवारण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून अशाेक घाटगेविराेधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर काेंढवा पाेलिसांनी अाराेपीवर बलात्कार, महाराष्ट्र नरबळी अाणि अमानुष, अनिष्ट अघाेरी प्रथा जादूटाेणा प्रतिबंध उच्चाटन कायदा २०१३ च्या कलम (११) नुसार गुन्हा दाखल केला अाहे. या भाेंदूबाबाने अाणखी काही महिलांना फसवले अाहे काय याचाही पाेलिस अधिकारी कसून तपास करत अाहेत.