आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात ‘व्हॅलेंटाइन डे’च्या पार्टीत मित्राने केला मैत्रिणीवर बलात्कार, एकाला अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी आयोजित पार्टीत तरुणीवर बलात्कार केल्याची घटना रविवारी पुण्यात उघडकीस आली. याप्रकरणी फिराेज महंमद शेख (22) याला अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणी तीन मैत्रिणींसह अमानोरा पार्क परिसरात राहते. तिथेच असलेल्या जिमचा प्रशिक्षक आणि त्याचा मित्र फिरोज यांच्याशी तरुणींची ओळख झाली. त्या ओळखीतूनच व्हॅलेंटाइन डेची पार्टी करण्याचे ठरले.
शनिवारी रात्री जिम प्रशिक्षक आणि फिरोज या तरुणींच्या फ्लॅटवर गेले. रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू होती. त्यानंतर तिन्ही तरुणी शेजारच्या खोलीत झोपण्यासाठी गेल्या. मात्र, पीडित तरुणी दुसऱ्या रूममध्ये झोपली. उशीर झाल्याने जिम प्रशिक्षक आणि फिरोज तिथेच झोपले. मात्र, पहाटे शेखने संधी साधून एकट्या झोपलेल्या तरुणीच्या खोलीत घुसून तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरुणी मूळची कोलकाता येथील असून तिचे एमबीएपर्यंतचे शिक्षण झाले आहे. ती एका मार्केटिंग कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.