आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर पुण्यात बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग, आरोपींना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - वाघाेलीत काॅम्प्युटर इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षास शिकत असलेल्या १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडित तरुणीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी करण श्रीकांत घुगे, महेश दत्तात्रय काेरडे आणि अविनाश शेळके यांना अटक केली.

पीडित तरुणी रत्नागिरी येथील रहिवासी असून जुलै महिन्यापासून ती काॅम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी वाघाेली येथे वास्तव्यास आहे. याच महाविद्यालयात तिची बहीण शिक्षण घेत आहे. १८ अाॅक्टाेबर राेजी पीडित तरुणी पेपर संपवून खाेलीकडे जात होती. त्या वेळी काॅलेज रस्त्यावर महाविद्यालयातील एका तरुणाने तिला थांबवून ‘माझे सबमिशन चालू अाहे. मला फाइल लावायला मदत करशील का?’ अशी विचारणा केली. त्यानंतर तरुणीने त्यास ‘तू काेण अाहेस? मी तुला अाेळखत नाही,’ असे सांगितले. मात्र त्यानंतरही त्याने ‘तू मला अाेळखत नाहीस, पण काेणाची मदत नसल्याने माझे सबमिशन थांबले अाहे.
मला प्लीज मदत कर,’ अशी विनवणी करून तिला खाेलीवर नेले अाणि तिथे तिच्यावर अत्याचार केले. पीडित तरुणी १९ अाॅक्टाेबर राेजी महाविद्यालयात असताना तिला माेबाइलवर ‘अाय नाे युवर फीलिंग, अाय अॅम महेश’ असा मेसेज आला. तरुणीने त्याला फाेन केला असता काल करणने तुझ्यासाेबत काय केले अाहे हे मला माहीत अाहे, असे ब्लॅकमेल करत महेशनेही तिच्यावर अत्याचार केले.
बातम्या आणखी आहेत...