आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांच्या मित्राने खेळायला नेऊन केला 6 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार; नराधमास अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- काळेपडळ येथे ओळखीचा गैरफायदा घेत एका 6 वर्षाच्या चिमुकलीला नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पीडित चिमुकलीच्या वडिलांबरोबर काम करणाऱ्या नराधमानेच हे कृत्य केले आहे. चश्मू उर्फ सदेर मंहमद उमर खान (वय. 26) असे आरोपीचे नाव आहे. रविवारी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली.
 
बराच वेळ झाल्यानंतर ही चिमुरडी घरी न आल्याने तिच्या वडिलांनी तिचा शोध घेतला. त्यावेळी एका इमारतीच्या टेरसवर ती सापडली. त्यानंतर त्यांनी याबाबतची पोलिसांकडे फिर्याद दिली. या चिमुरडीचे वडील एका बांधकामाच्या ठिकाणी काम करतात. त्याच ठिकाणी आरोपीही काम करतो. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...