आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदा फेसबुकवर दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर केला रेप, आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- फेसबुकवर वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन नंतर तिच्यावर बलात्कार करणाऱ्या युवकाचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी तरुणाचा जामिन फेटाळला. निखील श्रीकांत गोडसे पाटील (रा. नऱ्हे) असे जामिन फेटाळलेल्या युवकाचे नाव आहे. 

या प्रकरणात आकाश प्रशांत वाघ (वय 22, रा. दत्तनगर) याला अटक करण्यात आली आहे, तो न्यायालयीन कोठडीत आहे. तर अथर्व राहुल राजे (वय 18, रा. हिंगणे खुर्द) याच्यावरही या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. याबाबत 17 वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. ही घटना धनकवडी भागातील एका बंगल्यात 11 मार्च ते 5 आॅगस्ट 2017 या कालावधीत घडली.
 
काय आहे प्रकरण?
पीडित मुलगी ही अथर्व याची वर्ग मैत्रीण होती. अथर्व याने मामेभाऊ आकाश याला फिर्यादीच्या संपर्कात आणले. आकाश याने फिर्यादीला फेसबुकवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अथर्व याचा मामेभाऊ असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघे सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्कात होते. नंतर भेटणे सुरू झाले. दोघात प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबतची माहिती आकाश याने मित्र निखील याला दिली. 
 
शारिरिक संबंधाची मागणी
निखील याने पीडित मुलीकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने त्यास नकार दिला. त्यानंतर तिचे आकाश सोबत असलेल्या संबंधाची माहिती आई-वडिलांना कळवण्याची आणि त्याच्याकडे तिचे अश्लील फोटो आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला अथर्व याच्या आजोबाच्या बंगल्यावर बोलावले. त्यावेळी अथर्व याच्या उपस्थितीत निखील आणि आकाश या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी फिर्यादी तेथून निघून गेली. त्यानंतर एका महिन्यांनी निखील आणि आकाश या दोघांनी शारीरिक संबंध ठेवण्याची धमकी फिर्यादीला दिली.
 
असा कळाला मुलीच्या घरी प्रकार
या प्रकारामुळे भेदरलेल्या फिर्यादी मुलीने घरी जावून वेगवेगळ्या औषधांच्या गोळ्या सेवन केल्या. त्यानंतर रुग्णालयात उपचार केल्यानंतर फिर्यादीच्या घरी ही घटना कळली. या प्रकरणात पोलिसांनी निखील आणि आकाश या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. निखील याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. निखील हा मुख्य आरोपी आहे. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...