Home | Maharashtra | Pune | Rape on Minor Girl in Pune Form 10th Student

धक्कादायक...पुण्यात दहावीच्या विद्यार्थ्याने अल्पवयीन मुलासोबत केले अनैसर्गिक कृत्य

प्रतिनिधी | Update - Sep 28, 2017, 12:59 PM IST

पिंपरी चिंचवडमधील दापोडी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे, दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यान

  • Rape on Minor Girl in Pune Form 10th Student
    पुणे- पिंपरी चिंचवडमधील दापोडी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे, दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने दहा वर्षीय मुलावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. सरस्वती आश्रम शाळेत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आरोपी मुलाला दापोडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडीमधील सरस्वती आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शाळेतील एका विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने दापोडी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

    जून ते ऑगस्ट या काळात वेळोवेळी आरोपीनी पीडित विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार संस्था चालक देविदास लक्ष्मण सुरवसे यांना माहीत होता. परंतु त्यांनी पोलिसांना सांगितले नाही. प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलाच्या पालकांना आरोपीच्या पालकांनी 12 हजार रुपये दिल्याचीह‍ी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदाळे हे करत आहेत.

Trending