आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिस असल्याचे सांगून महिलेवर बलात्कार, सव्वादोन लाख रुपयेही उकळले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पाेलिस असल्याचे सांगून विवाहित महिलेशी जवळीक साधत एका तरुणाने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. दरम्यान, तरुणाने आपल्याकडील सव्वादोन लाख रुपये घेतल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी स्वप्निलकुमार शहाजी थाेरात (रा.अाळंदी, ता. खेड, पुणे) याला अटक करण्यात अाली अाहे. पीडित महिला विवाहित असून ती लघुउद्याेजक अाहे, तर अाराेपीदेखील विवाहित असून ताे फायर ब्रिगेडमध्ये नोकरी करतो.  काही दिवसांपूर्वी  त्याची  महिलेशी ओळख झाली. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. तसेच सव्वादोन लाख रुपये उकळले.
 
बातम्या आणखी आहेत...