आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rashtriya Samaj Party Spokeperson Mohan Adsool Died In Car Accident, Divya Marathi

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रवक्ते मोहन अडसूळ यांचा पुण्याजवळ कार अपघातात मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रवक्ते मोहन अडसूळ (वय 45) यांचा शुक्रवारी रात्री पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघाती मृत्यू झाला.अपघातात त्यांच्या गाडीचा चालक नितीन भोसले ( वय 32, रा. कोरेगाव, सातारा) जखमी झाला आहे.

शुक्रवारी महादेव जानकर हे मुंबईत रामदास आठवले यांच्यासोबत निवडणूक रॅलीत होते. तर मोहन अडसूळ हे सातारा जिल्हयातील माण तालुक्यातील म्हसवड येथील रासपचे उमेदवार शेखर गोरे यांच्यासाठी एक प्रचार रॅली करून मुंबईच्या दिशेने जात होते. कामशेत बोगद्याजवळ अडसूळ यांची फॉर्च्युनर गाडी समोरील ट्रकला ओव्हर टेक करताना जोरात आदळली. अडसूळ नेमके त्याच बाजूला पुढील सीटवर बसले होते. गाडीचा वेग भरपूर असल्यामुळे अडसूळ यांचा जागीच मृत्यू झाला. फॉर्च्युनर गाडीही चक्काचूर झाली आहे.
अडसूळ हे महादेव जानकर यांचे निकटवर्तीय होते. सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे रहिवासी असलेले अडसूळ हे सध्या भांडूप येथे राहत होते. अडसूळ यांच्या अपघाती मृत्यूने रासपला धक्का बसला आहे. नुकतेच राजकारणात आलेल्या एखाद्या तरूणाचा असा दुर्देवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.