आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्झरी गाड्यांचे हे आहेत चाहते, मुलीला गिफ्ट केली होती 5 कोटींची कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मारुती ८०० असो, लान्सर असो किंवा स्कोडा, आेपरा, मिनी कूपर, मेबॅकसारख्या ५ कोटींच्या कार असू देत. याचा देशातील पहिला ग्राहक कोण? याचे उत्तर आहे रसिकलाल धारीवाल. हे पुण्याचे उद्योजक आहेत. त्यांनी २००५ मध्ये मुलगी जान्हवीला तिच्या २१व्या वाढदिवसानिमित्त मेबॅक कार भेट दिली. रसिकलाल पूर्वीपासूनच कारचे चाहते आहेत. १९५० च्या दशकात त्यांनी ९०० रुपये माेजून स्टडबेकर खरेदी केली होती. अनेक महागड्या कारचा संग्रह करण्यासाठी त्यांची ख्याती आहे. बीएमडब्ल्यू, मर्सिडीझ बेंझ, लेक्सस, जग्वार यांचे नवे मॉडेल आले की ते हमखास खरेदी करतात.

रसिकलाल १४ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांचा विडी बनवण्याचा कारखाना होता. हाच उद्योग त्यांनी पुढे विस्तारत नेला. आज आंतरराष्ट्रीय शाळा, धर्मादाय संस्था, बांधकाम उद्योग, पॅकेजिंग, मिनलर वॉटर, रुग्णालय आदी क्षेत्रांत त्यांची गुंतवणूक आहे. माणिकचंद गुटख्याचे निर्माते रसिकलाल यांनी दोन विवाह केले. पहिल्या पत्नीचा मुलगा प्रकाश आहे. हा वडिलांचा सर्व उद्योग सांभाळतो. पुण्यापासून ६० किलोमीटरवर असलेल्या सरदवाडी येथे त्यांचा कारखाना आहे. रसिकलाल दुबईत राहत असून ते एनआरआय आहेत.
धारीवाल-जोशींच्या भांडणात दाऊदची मध्यस्थी : सीबीआय
मुंबई पोलिसांनी दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिसच्या गंुडांची चौकशी केल्यानंतर रसिकलाल यांचे नाव समोर आले. या लोकांनी दिलेल्या जबाबात रसिकलाल आणि जे. एम. जोशींच्या नावाचा उल्लेख होता. जोशीदेखील गुटखा उद्योगात आहेत. दोघांची गोवा गुटख्यात भागीदारी आहे. हे प्रकरण सीबीआयकडे गेले. सीबीआयने आरोपपत्र दाखल केले. जोशी आणि रसिकलालमधील तणावात दाऊदने मध्यस्थी केल्याचे यात म्हटले आहे. या मोबदल्यात दाऊदच्या भावाला पाकिस्तानमध्ये गुटखा उद्योगात त्यांनी मदत केली. दोघांना काही दिवसांपूर्वी अंतरिम जामीन मिळाला आहे.

रसिकलाल धारीवाल : उद्योजक
कुटुंब - दोन पत्नी, मुलगा प्रकाश, मुलगी जान्हवी
चर्चेत का?- सीबीआयने त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

पुढील स्लाईड्सवर पाहा, रसिकलाल धारिवाल यांच्याशी संबंधित काही खास फोटो...
बातम्या आणखी आहेत...