आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिलाच्या हत्येत आणखी काही जणांचा सहभाग; वडील, भावाचा पत्रकारपरिषदेत दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - इन्फाेसिस कंपनीत संगणक अभियंता रसिला राजू अाेपी हिच्या हत्येत सुरक्षा रक्षकाशिवाय अधिक व्यक्तींचा समावेश असू शकताे, असा दावा रसिलाचे वडील राजू अाेपी अाणि भाऊ लेजिनकुमार यांनी गुरुवारी पत्रकारांशी बाेलताना केला. या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी पाेलिस अायुक्तांना भेटून केली अाहे.   

लेजिनकुमार म्हणाला, तपास कोणत्या दिशेने सुरू आहे, याची माहिती घेण्यासाठी आम्ही पाेलिस अायुक्तांना भेटलाे. रसिलाला कंपनीतील वरिष्ठ त्रास देत हाेते, याबाबतची कागदपत्रे अाम्ही पाेलिसांना दिली अाहेत. घटनेच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली.  कंपनीत कामास जाणाऱ्या महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे. तसेच अाराेपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केल्याचे तो म्हणाला. 
 
एकास नाेकरी द्यावी   
पुणे मल्याळी फेडरेशनचे राजन नायर म्हणाले, रसिला हिच्या कुटुंबीयांना इन्फाेसिस कंपनीतर्फे नुकसान भरपार्इ म्हणून एक काेटी रुपये मिळावेत. तिच्या अायसीअायसीअाय लाेम्बार्ड विम्याचे दहा लाख रुपये अाणि कुटुंबातील एका व्यक्तीस नाेकरीस घ्यावे, अशा अामच्या मागण्या अाहेत. या प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी विविध कंपन्यांमध्ये महिलांसाठी सुरक्षा व्यवस्था चांगली असावी यासाठी  पाेलिसांनी पुढाकार घ्यावा.
   
बातम्या आणखी आहेत...