आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ratnakar Mahajan Says Congress Needs To Review Seat Sharing Formula With NCP

NCPची सध्याची स्थिती बघता त्यांना 16 च जागा सोडाव्यात- रत्नाकर महाजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- किती जागा लढविल्या ते महत्त्वाचे नसून किती जागा जिंकल्या हे महत्त्वाचे ठरते. सर्व पक्षाचे तेच उद्दिष्ट असते तेच आपलेही असायला पाहिजे. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनमानसातील प्रतिमा पाहता व त्यांच्या मागील कामगिरीकडे पाहता जागावाटपाचा 16-32 फॉर्म्यूला योग्य ठरेल, असे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी म्हटले आहे.
16 पेक्षा जेवढ्या जास्त जागा म्हणजे अगदी एक-एक जरी जास्त दिली तरी ती जागा भाजप-शिवसेनेला विजयी करण्यासाठीच दिली असे होईल. त्यामुळे काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपाबाबत राष्ट्रवादीला किती जागा सोडायच्या याचा फेरविचार करावा असे महाजन यांनी म्हटल्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हे आपले वैयक्तिक मत असून, माझ्या मताशी पक्षाचा काहीही संबंध नाही. यासाठीच आपण पक्षाच्या पातळीवर नव्हे तर आपल्या वैयक्तिक फेसबुक अकांऊटवर हे मत व्यक्त केल्याचे स्पष्टीकरण महाजन यांनी दिले आहे.