आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

BJP ची भूमिका मला मान्य, मी आमदार होणारच; नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/पुणे- भाजपने घेतलेली भूमिका मला मान्य असून मी लवकर आमदार होईल असा आशावाद नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. भाजपकडून मला संधी मिळाली असती तर शिवसेनेची मते फुटली असती. मात्र शिवसेनेच्या विरोधानंतरही विधानपरिषदेची पोटनिवडणूक मी जिंकलो असतो असा विश्वास राणेंनी बोलून दाखवला आहे. 

 

माझ्या विरोधात शिवसेना-काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आल्याचेही त्यांनी नमूद केले.  तत्पूर्वी राणे यांना विधान परिषद अथवा मंत्रिपदाचे आश्वासन दिलेले नाही, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले होते. NDAच्या  विस्ताराच्या वेळी राणे यांच्या मंत्रिपदाचा विचार करण्यात येईल, असे दानवे म्हणाले होते. 

 

भाजपमध्ये नाराजीचे सूर?

भाजपने विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी प्रसाद लाड यांना उमेदवारी दिल्याने भाजपमधूनच नाराजीचे सूर उमटत असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपकडून पक्षनिष्ठ आणि मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांच्या नावाची चर्चा होती. माधव भांडारी हे पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या प्रसाद लाड यांना भाजपने विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिल्याने पक्षा्च्या काही कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती.. 

 

 

बातम्या आणखी आहेत...